Pune District : कारेगाव शाळेचा शिक्षक अखेर निलंबित

रांजणगाव गणपती : कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन मुलींबरोबर गैरवर्तन करणार्या अनिल महादेव शेळके (रा. सोनेसांगवी) या शिक्षकाचे निलंबन केले असल्याची माहिती शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली आहे.
कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अनिल महादेव शेळके या शिक्षकाने आपल्याच वर्गातील मुलींबरोबर अश्लील वर्तन करून त्यांच्या मनातला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून या मुलींचा विनयभंग केला आहे.
या नराधम शिक्षकाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला शिरूर पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी निलंबित केले असल्याचे सांगितले.
कारेगाव येथील ग्रामस्थांनी या गंभीर प्रकाराची आम्हाला माहिती देताच त्याच दिवशी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने या शिक्षकाला तातडीने निलंबित केले असल्याचे गटशिक्षणाधिकारी कळमकर यांनी सांगितले.





