अभिनेत्री करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांचा ‘द क्रू’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होते. या चित्रपटाची रिलीज डेट आज शेअर करण्यात आली आहे.
या तिन्ही अभिनेत्रींनी ‘द क्रू’ चित्रपटाचा टीझर शेअर करून प्रेक्षकांना चित्रपटाची झलकही दाखवली आहे. चित्रपटाच्या टीझरचे बैकग्राउंड म्यूजिक सध्या चर्चेत आहे.
View this post on Instagram
टीझरच्या सुरुवातीला विमान टेक ऑफ होते आणि अभिनेत्रींची नावे समोर येतात. व्हिडिओमध्ये विमानाचा कॅप्टन घोषणा करताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘भगिनींनो, मी तुमचा कॅप्टन बोलतोय. आजच्या फ्लाइटमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आमचे कर्मचारी तुमची खूप काळजी घेतील. पण माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की,’चोली टाइट बांध लें ताकि दिल बाहर ना गिर जाए.’
यानंतर तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन एअर होस्टेसच्या गणवेशात दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत ‘चोली के पीचे क्या है’ गाण्याचे संगीत वाजते आहे. या तिघांच्या चालण्याच्या शैलीवरून चित्रपटात ग्लॅमरची छटा असणार आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
‘द क्रू’ चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट तीन मेहनती महिलांवर आधारित असेल. या तिघी एअरलाइन इंडस्ट्रीचा भाग आहेत आणि त्यांच्या करिअरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्यांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.
यामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेननसोबत दिलजीत दोसांझ दिसणार आहे. याशिवाय कॉमेडियन कपिल शर्मा, एकता कपूर, शोभा कपूर, रिया कपूर आणि अनिल कपूर यात खास भूमिका साकारताना दिसणार आहे. निधी मेहरा आणि मेहुल सुरी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. त्याचे दिग्दर्शक राजेश कृष्णन आहेत. तब्बू आणि करीना कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे.