करणवीर मेहराने पटकावली ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी; विवियनला दिली तगडी टक्कर

Karan Veer Mehra BB Winner | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बिग बॉस सीझन 18 चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. करणवीर मेहराने बिग बॉस 18 च्या विजेत्या पदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तर, विवियन डिसेना या शोचा उपविजेता ठरला आहे. करण वीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंह, रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि चुम दरंग हे यंदाच्या सीझनचे टॉप 6 फायनलिस्ट होते. यावेळी बिग बॉसच्या घरातील सहाही फानलिस्टने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केले.
अविनाश मिश्रा एविक्ट झाल्यानंतर विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल हे टॉप ३ मध्ये पोहचले होते. यात अखेर करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता ठरला. सुरुवातीपासूनच विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांचं नाव विजेत्याच्या शर्यतीत होतं.
बिग बॉस 18 चा विजेता झाल्यानंतर करणवीर मेहराला बिग बॉसची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आलं. विशेष म्हणजे करणवीर मेहरानं ‘खतरों के खिलाडी 14’चीही ट्रॉफी पटकावली होती. यानंतर आता ‘बिग बॉस १८’च्या ट्रॉफीवर देखील त्याने आपले नाव कोरले आहे. Karan Veer Mehra BB Winner |
हेही वाचा:
महायुतीतील नाराजी नाट्यानंतर ‘या’ दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती; राज्य सरकारचा निर्णय





