Bigg Boss Marathi 6 : ‘या’ सदस्याने पटकावले ‘बिग बॉस मराठी ६’चे ‘तिकीट टू फिनाले’
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात कॉमेडीचा किंग सागर कारंडे घराबाहेर पडला. त्यामुळे आता घरात सात सदस्य उरलेत. नुकतेच घरात ‘तिकीट टू फिनाले’साठी टास्क रंगला.
या टास्कमध्ये घरातल्या एका सदस्याला थेट ‘तिकीट टू फिनाले’ पटकावयाचे होते. यात जिंकलेल्या एका सदस्याला थेट ‘बिग बॉस मराठी सीझन 6’च्या महाअंतिम फेरीत आपलं स्थान मिळाले आहे.
या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोल्ते आणि अनुश्री माने यांच्यात लढत पाहायला मिळाली. स्पर्धकांसमोर ‘कोळ्याचं महाकाय जाळं’ उभं करण्यात आलं होतं. तर, जाळ्याच्या एका बाजूला 7 प्रश्न आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या 7 प्रश्नांची उत्तरं ठेवलेली, कोळ्याचं जाळं भेदून स्पर्धकांना अचूक उत्तरं शोधून ती त्या प्रश्नांसमोर लावायची होती. Bigg Boss Marathi 6
View this post on Instagram
तिन्ही स्पर्धकांनी हा टास्क पूर्ण केला. सर्वात आधी राकेश बापटनं 21 मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यानंतर आलेल्या तन्वी कोलतेनं साडेसहा मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. तर, नंतर आलेल्या अनुश्री मानेनं नऊ मिनिटांच्या आसपास वेळ घेतला. त्यामुळे सर्वात कमी वेळ घेऊन तन्वीनं स्वतःला सिद्ध केलं आणि ‘तिकीट टू फिनाले’ पटकावलं.
‘तिकीट टू फिनाले’ तन्वी कोलतेनं पटकावलं
बिग बॉस सीझन सहाचं सर्वात पहिलं ‘तिकीट टू फिनाले’ तन्वी कोलतेनं पटकावलं त्यामुळे ती आता तेराव्या आणि चौदाव्या आठवड्यासाठी सेफ झाली आहे. तर, रेवा कौरासे या आठवड्याची कॅप्टन असल्यामुळे सेफ आहे.
नॉमिनेट सदस्य
या दोघींव्यतिरिक्त उर्वरित सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. ज्यात राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि राखी सावंत या सदस्यांचा समावेश आहे. Bigg Boss Marathi 6
हेही वाचा:
Pune District : अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; पिरंगुट-लवळे परिसरातील शेतकरी संकटात : पंचनामे सुरू





