केंदूर -येथे दोन दिवसांत तब्बल सहा रुग्ण करोना बाधित आढळल्याने संपूर्ण गाव 14 दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शनिवारी (दि. 18) गावाला भेट देऊन संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून गाव 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन आठवड्यापूर्वी पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील उपबाजारात करोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्केटयार्ड पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. करंदी गावच्या चारही बाजूला करोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तळेगाव रोड 1, बनसुडी 1, धमारी रोड परिसरात 1 तर केंदूररोड परिसरात एकाच कुटुंबातील 3 सदस्यांना लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 40 व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे 18 जुलै ते 31 जुलैपर्यंत संपूर्ण गाव बंद राहणार आहे. मुख्य रस्ते बंद केले आहेत.