कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन पाहिलंत का?
Updated On:

मुंबई : देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये ख्रिसमस अर्थात नाताळचे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. ख्रिश्चन धर्मातील या पवित्र सणानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरा करणारे बॉलिवूडकर देखील ख्रिसमस निमित्ताने स्पेशल पार्टीज अटेंड करताना दिसत आहेत. मग या सेलिब्रेशन सिझनमध्ये अगदी सर्वच सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करणारी कपूर फॅमिल मागे राहिली तर नवलंच! खास ख्रिसमस निमित्ताने आज बॉलिवूडकर कपूर फॅमिलीने आपल्या मुंबईतील निवासस्थानी ‘ख्रिसमस ब्रंच’चे आयोजन केले आहे.
कपूर फॅमिलीच्या या खास ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी ऋषी व नीता कपूर, करिष्मा कपूर, सैफ करीना व तैमूर तसेच बी-टाऊनमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले कपल अर्थात रणबीर कपूर व आलीय भट यांनी हजेरी लावली आहे.











