प्रदर्शनाच्या दिवशीच लीक झाला कपिल शर्माचा बहुचर्चित ‘झ्विगाटो’ सिनेमा

मुंबई – ‘कपिल शर्मा’ देशातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले, आता कपिलचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आजच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात कपिलने एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे जो आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी संघर्ष करतो. त्याचे जीवन 5 स्टार रेटिंग आणि प्रोत्साहन यांच्यात संघर्ष करत राहते. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
त्याचवेळी चित्रपटाबाबत एक वाईट बातमी येत आहे. ‘झ्विगाटो’ रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी ऑनलाइन लीक झाले आहे आणि आधीच अनेक साइटवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध देखील झाला आहे. चित्रपटाच्या ऑनलाइन लीकमुळे आता त्याच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची अवस्था बिकट झाली आहे. खरंतर कपिल शर्माच्या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 50 लाखांचा व्यवसाय केला आहे.
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास दिग्दर्शित ‘झ्विगाटो’ या चित्रपटात कपिल शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. कपिल शर्मानेही पात्राला न्याय देण्यासाठी आपलं वजन देखील वाढवले आहे. इतकंच नाही तर त्याने या चित्रपटासाठी वापरलेली भाषाही वेगळी आहे. या चित्रपटात कपिल शर्माच्यासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी दिसत आहे.





