Kapil Sharma : ॲटलीच्या दिसण्यावरून कपिलने उडवली खिल्ली; नेटकऱ्यांनी घेतलाच खरपूस समाचार, पाहा Video

Kapil Sharma | Atlee Kumar : कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. कधी त्याच्या शोमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे तो नेहमीच न्यूजच्या फ्रंटमध्ये असतो. अश्यातच कपिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या कपिल ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ यामधून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे.
नुकतंच या शो मध्ये ‘बेबी जॉन’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक ‘अटली’सुद्धा इतर कलाकारांसोबत उपस्थित होता. यावेळी कपिलने अटलीवर वर एक कमेंट केल्याचं दिसून आलं. ती वर्णद्वेषी असल्याची टीका नेटकरी करत आहेत. त्यामुळे आता कपिल पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. मात्र, यावर आता कपिलने प्रतिक्रिया दिली आहे.
कपिलच्या शोमधील ही क्लिप अनेक सोशल मीडिया युजर्सनी शेअर केली आहे. कपिल शर्माने अटलीचा लूकवरून अपमान केला? आणि त्याने सडेतोड उत्तर दिलं, असं कॅप्शन देत एका युजरने ही क्लिप शेअर केली आहे.
Dear sir, can you pls explain me where n when I talked about looks in this video ? pls don’t spread hate on social media 🙏 thank you. (guys watch n decide by yourself, don’t follow any body’s tweet like a sheep). https://t.co/PdsxTo8xjg
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) December 17, 2024
ती पोस्ट रिपोस्ट करत कपिलने लिहिलं, “प्रिय सर, मी या व्हिडीओमध्ये केव्हा आणि कुठे त्याच्या लूक्सबद्दल बोललो हे तुम्ही मला सांगू शकता का? कृपया सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका. धन्यवाद.” याच पोस्टमध्ये कपिल लोकांना म्हणाला, “तुम्ही स्वतः एपिसोड पाहा आणि ठरवा. मेंढरासारखे कोणाचेही ट्विट फॉलो करू नका.” असं कपिल म्हणाला आहे.
नेमकं काय घडलं होतं? पाहा
या एपिसोडमध्ये कपिल अटलीला मस्करीत विचारतो, “तू इतका तरुण आणि इतका मोठा दिग्दर्शक-निर्माता आहेस. पण जेव्हा तू सेलिब्रिटींना पहिल्यांदा भेटतोस, तेव्हा ते असं विचारतात का, अटली कुठे आहे?” त्यावर अटली उत्तर देतो, “मला तुझा प्रश्न समजला. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी ए. आर. मुरुगादोस सरांचा खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती.
त्यांनी माझी स्क्रिप्ट वाचली, पण मी कसा दिसतो याकडे पाहिलं नाही किंवा मी त्या पात्रतेचा आहे की नाही याकडेही लक्ष दिलं नाही. पण त्यांना माझी कथा आवडली. मला असं वाटतं की जगाने ही गोष्ट पहायला हवी. आपण एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या प्रतिभेचं मूल्यमापन नाही केलं पाहिजे. दिसण्यावरून मतं नाही बनवली तर उत्तम. तुम्ही लोकांच्या मनावरून त्यांच्याबद्दल मत बनवा.” असं यावेळी शो मध्ये घडलं होत.





