आंबे चोखून खाता की कापून ? मोदींना विचारलेल्या प्रश्नावरून खिल्ली उडवल्याने अक्षय संतापला

मुंबई : बॉलिवूडचे सर्वच कलाकार आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावत असतात. अभिनेता खिलाडी अक्षय कुमार देखील आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये जातो. मात्र आता कपिल शर्माच्या शोमध्ये प्रमोशनसाठी कधीही जाणार नसल्याच अक्षय कुमारने म्हटलं आहे.
अक्षयने आपला आगामी चित्रपट बच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी कपिलच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयने असा निर्णय का घेतला याचं कारण समोर आलं आहे.
गेल्यावेळी अक्षय कुमार जेव्हा कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. त्यावेळी अक्षयने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीतील एका प्रश्नवरून कपिल शर्माने अक्षयची फिरकी घेतली होती.
अक्षय कुमारने मोदींना आंबे कसे खाता चोखून खाता की कापून ? असा प्रश्न विचारला होता. त्यावरून कपिलने अक्षयची फिरकी घेतली. त्यावेळी अक्षय निरुत्तर झाला होता. शुटींगनंतर अक्षयने मोदींसंदर्भातील प्रश्नाचा भाग वगळण्यास सांगितलं होतं. पण तस झालं नाही. उलट ती क्लिप लीक झाली. यामुळे अक्षय कुमार कपिल शर्मा शोवर नाराज असल्याचं बोललं जातं.
दरम्यान क्लिप व्हायरल झाल्यामुळे अक्षय नाराज झाला असून यापुढे आपण कधीही कपिल शर्मा शोमध्ये जाणार नसल्याचं त्याने म्हटलं आहे.





