‘त्या’ घटनेनंतर कंगणाने शेअर केली पोस्ट; म्हणाली “कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही…”

Kangana Ranaut| नवनिर्वाचीत खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतं मिळवून कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी भागात जिंकून खासदार झाली. अशातच चंदीगढ एअरपोर्टवर कंगनाला एका CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच तापले आहे. सध्या विमानतळावरील तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आता कंगणाने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.
कंगनाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “प्रत्येक बलात्कारी, खुनी किंवा चोर यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत असं भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असतं. कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. जर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीशी निगडीत असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करून गुन्हा करण्याची तीव्र प्रेरणा येणारच.” Kangana Ranaut|
Every rapist, murderer or thief always have a strong emotional, physical, psychological or financial reason to commit a crime, no crime ever happens without a reason, yet they are convicted and sentenced to jail.
If you are aligned with the criminals strong emotional impulse to…— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 8, 2024
कंगना पुढे लिहिते, “लक्षात ठेवा की, एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत खाजगी क्षेत्रात तुम्ही प्रवेश करत असाल, त्या माणसाच्या परवानगीशिवाय त्याच्या शरीराला स्पर्श करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करत असाल तर तुम्ही बलात्कार किंवा खून करणं सुद्धा ठीक आहे, असं म्हणाल. यामुळे घुसखोरी करणं किंवा एखाद्याला चाकूने भोसकणं ही तुम्हाला मोठी गोष्ट वाटणार नाही. या गोष्टीचा तुम्ही खोलवर जाऊन विचार करा. गुन्हेगारी मानसिक प्रवृत्तींबद्दल मी इतकंच सुचवेन की, कृपया योग आणि ध्यान करा. अन्यथा तुमच्यासाठी जीवन एक कटू अनुभव देणारं ओझं होईल. कृपया दुसऱ्याबद्दल इतका द्वेष, मत्सर बाळगू नका. स्वतःला मुक्त करा,” सध्या कंगणाची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दरम्यान, कंगना राणावत 6 जून रोजी नवी दिल्लीला जात असताना चंदीगड विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या CISF महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लगावली. कुलविंदर कौर नावाची महिला CISF कर्मचारी तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील महिलांबद्दल कंगनाने केलेल्या वक्तव्यावर नाराज होत्या. Kangana Ranaut|
ज्यामध्ये कंगनाने सांगितले होते की, या महिला पैशासाठी आंदोलनात सामील झाल्या होत्या. या आंदोलकांमध्ये महिला कॉन्स्टेबलची आई देखील होती. कंगनाने खोटे आरोप केल्याने या महिला कॉन्स्टेबलने कंगणाच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर अनेक सिनेकलाकरांनी कंगणाचे समर्थन केले आहे. तर काहींनी महिला कॉन्स्टेबलला पाठिंबा दर्शवला.
हेही वाचा:
JDU चा मोठा दावा ; I.N.D.I.A ने दिली होती नितीश यांना पंतप्रधानपदाची ऑफर





