JDU चा मोठा दावा ; I.N.D.I.A ने दिली होती नितीश यांना पंतप्रधानपदाची ऑफर

Nitish Kumar । नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार उद्या स्थापन होणार आहे. यात जेडीयूनेही पाठिंबा दिलाय. त्याचवेळी, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या विशेष मुलाखतीत मोठा खुलासा केलाय. त्यांनी “‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. परंतु, नितीश कुमार यांनी भाजप आणि एनडीएसोबतच राहणार असल्याचे इंडिया आघाडीला स्पष्ट सांगितले असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री नितीश यांचा मोदी सरकारला पाठिंबा Nitish Kumar ।
दरम्यान, एका वृत्तसंस्थेशी बोलताना केसी त्यागी म्हणाले की, पंतप्रधानांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना संदेश दिलाय. जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी यांनी एनडीएच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहे. आम्ही पुढील 5 वर्षांसाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला आमचा पाठिंबा दिला आहे.
केंद्रीय राजकारणात सीएम नितीश यांची चर्चा Nitish Kumar ।
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार चर्चेत आलेत. त्याच्याबाबत अनेक प्रकारच्या अंदाज बांधण्यात सुरुवात झाली होती. ‘इंडिया’ आणि एनडीए आघाडीच्या नेत्यांना त्यांना आपल्या गोटात ठेवायचे होते, परंतु मुख्यमंत्री नितीश यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला आणि मोदी सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्रही सादर केले. कोणत्याही एका पक्षाकडे सरकार स्थापनेचे जादूई आकडे नाहीत. याआधी एकट्या भाजपकडे पूर्ण बहुमत होते. यावेळी युतीच्या मदतीने भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.
त्यामुळे घटक पक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा सीएम नितीश यांच्यावर खिळल्या आहेत. त्याचवेळी पाटण्याहून दिल्लीला जात असताना विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीश यांच्यासोबत फ्लाइटमध्ये दिसले. या चित्रानंतर बिहारसह देशाच्या राजकारणातही उष्णता वाढली होती.





