‘चंद्रमुखी 2’ चित्रपटातील कंगनाचा शाही लूक रिलीज

अभिनेत्री कंगना राणावत ही बॉलिवूडची बोल्ड क्वीन आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलताना दिसते. कंगना तिच्या विधानांप्रमाणेच तिच्या चित्रपटांसाठीही प्रसिद्ध आहे. कंगना गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रमुखी 2 बद्दल चर्चेत आहे.
The beauty ✨ & the pose 😌 that effortlessly steals our attention! 🤩 Presenting the enviable, commanding & gorgeous 1st look of #KanganaRanaut as Chandramukhi 👑💃 from #Chandramukhi2 🗝️
Releasing this GANESH CHATURTHI in Tamil, Hindi, Telugu, Malayalam & Kannada! 🤗
— Lyca Productions (@LycaProductions) August 5, 2023
काही काळापूर्वी या चित्रपटातून अभिनेता राघव लॉरेन्सचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर चाहते कंगनाच्या फर्स्ट लूकची वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. निर्मात्यांनी चंद्रमुखी 2 मधील कंगनाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे, ज्यामध्ये ती राणीच्या भूमिकेत जबरदस्त दिसत आहे.
चंद्रमुखी 2 च्या निर्मात्यांनी चंद्रमुखी 2 मधील कंगनाचा फर्स्ट लूक उघड केला आहे. समोर आलेल्या कंगनाच्या शाही शैली दिसत आहे. या फोटोमध्ये कंगना कुरळे केस आणि धारदार वृत्तीने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. यावेळी तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा चोली घातली आहे.
यासह कंगनाने गळ्यात जड नेकलेस आणि कमरेला कमरपट्टा घालून तिला आणखी रॉयल दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. यादरम्यान, अभिनेत्रीची पोज देण्याची रॉयल स्टाइल पाहून, या चित्रपटातील तिची भूमिका खूप दमदार असणार आहे, हे स्पष्टपणे कळते. या फोटोवर कमेंट करून युजर्स त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.
=====================





