सोनू सूद म्हणाला,’प्रत्येक दुकानात फक्त माणुसकी नावाची पाटी असावी’ यावर कंगना राणावतने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Kangana Ranaut On Sonu Sood । यूपीमध्ये कंवर यात्रेदरम्यान दुकानांमध्ये नावाच्या पाट्या लावण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या प्रतिक्रियेनंतर आता हिमाचलच्या मंडीतील भाजप खासदार कंगना राणावतनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोनू सूदला प्रत्युत्तर दिले आहे.
सोनू सूद म्हणाला…
यूपीमधील कंवर यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर आणि गाड्यांवर दुकान मालकांच्या नावाने पोस्टर लावण्याच्या योगी सरकारच्या आदेशावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करताना अभिनेता सोनू सूदने लिहिले की, ‘प्रत्येक दुकानात एकच नेम प्लेट असावी आणि ती म्हणजे मानवता.”
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत म्हणाली,’सहमत आहे. हलालच्या जागी “मानवता” लिहिले पाहिजे. प्रत्येक दुकानात “मानवता” ही एकच नेम प्लेट असावी.’
Agree, Halal should be replaced with “ HUMANITY” https://t.co/EqbGml2Yew
— Kangana Ranaut (@KanganaTeam) July 19, 2024
यूपीमधील कंवर यात्रेच्या मार्गावर दुकानदारांच्या नावाच्या पाट्या लावण्याच्या आदेशाला वापरकर्ते सोनू सूदच्या या पोस्टशी जोडत आहेत. यूपी सरकारने कंवर यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर ‘नेम प्लेट’ लावणे अनिवार्य केले आहे. सत्ताधारी पक्षाने हे कौतुकास्पद पाऊल म्हटले असतानाच विरोधक मात्र त्यावर निशाणा साधत आहेत.
कंवर यात्रेच्या मार्गावर येणारे लोक हरिद्वार आणि गोमुख येथून पाणी आणण्यासाठी 250-300 किलोमीटरचा प्रवास करतात, असे उत्तर प्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी सांगितले होते. यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की, हिंदू देवदेवतांच्या नावाने ढाबे आणि हॉटेल चालवणारे बहुतांश लोक मुस्लिम समाजातील आहेत. हिंदू देवी-देवतांच्या नावाची दुकाने आणि तिथे मांसाहारी विक्रीवर बंदी घालावी.
यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की, असे आदेश पूर्णपणे अव्यवहार्य आहेत. देश आणि समाजातील बंधुभावाची भावना बिघडेल. आपापसात दुरावा निर्माण होईल. तो ताबडतोब काढावा.





