Kangana Ranaut । कंगनाला मारणाऱ्या CISF महिलेचं ऑलिम्पिक विजेता खेळाडूने केलं कौतुक; ट्विट चर्चेत….

Kangana Ranaut । Bajrang Punia : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतला चंदीगड विमानतळावर महिला CISF जवानाने कानाखाली मारली. शेतकरी आंदोलनादरम्यानच्या कंगना राणावतच्या वक्तव्यामुळे महिला संतप्त झाली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची आईही शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलन करायला बसली होती.
कंगना राणावतला कानाखाली मारल्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौर म्हणाल्या, “शेतकरी तिथे 100 रुपयांसाठी बसले आहेत, असे तिने विधान केले होते. ती तिथे जाऊन बसेल का? जेव्हा त्यांनी हे विधान केले तेव्हा माझी आई तिथे बसून निषेध करत होती.” दरम्यान, कंगना राणावतला कानाखाली मारल्यानंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला असून, यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, अश्यातच ऑलिम्पिक पदक जिंकणारा हरयाणाचा रेसलर बजरंग पुनियाने ट्विट करत नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. त्याने लिहिलं, ‘जेव्हा महिला शेतकऱ्यांविषयी बरंवाईट बोललं जात होतं, तेव्हा ही नैतिकता शिकवणारे लोक कुठे होते? आता त्या शेतकरी आईच्या मुलीने गाल लाल केला तर शांतीची शिकवण द्यायला पुढे आले. सरकारच्या अत्याचाराने शेतकरी मारले गेले, त्यावेळी ही शांतीची शिकवण सरकारला द्यायला पाहिजे होती.’ असं तो म्हणाला.
जब महिला किसानों के लिए अनाप शनाप बोला जा रहा था तब कहाँ थे नैतिकताएँ पढ़ाने वाले लोग! अब उस किसान माँ की बेटी ने गाल लाल कर दिया तो शांति का पाठ पढ़ाने आ गये. सरकारी जुल्म से किसान मारे गये उस समय यह शांति पाठ पढ़ाना था हुकूमत को!
—-
घटाएँ उठती हैं बरसात होने लगती है
जब आँख… pic.twitter.com/1311Ajedso— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 7, 2024
या पोस्टच्या शेवटी त्याने एक शायरीसुद्धा लिहिली आहे. ‘घटाएं उठती है बरसात होने लगती है, जब आंख भर के फलक को किसान देखता है’, अशी शायरी त्याने लिहिली आहे. बजरंग पुनियाने महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात भाग घेतला होता. त्याचसोबत शेतकरी आंदोलनातही तो दिसला होता. बजरंगने याआधीही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे.
कंगना राणावत काय म्हणाली? पाहा…..
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
भाजप खासदार कंगना राणावतने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती सुरक्षित आणि बरी आहे, परंतु पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे चिंतेत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने एक निवेदन जारी केले की, कंगना म्हणाली, “महिला कॉन्स्टेबल तिच्या दिशेने आली. तिने मला थप्पड मारली आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली.’ दरम्यान, कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार म्हणून निवडणूक आल्या आहेत.





