Kangana Ranaut : “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी…”; ‘त्या’ प्रश्नाला कंगनाने दिलं सणसणीत उत्तर

Kangana Ranaut | Emergency Movie : नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री-भाजप खासदार कंगना राणावत हिने ‘इंडियन आयडॉल 15’ या देशातल्या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ या विशेष भागात हजेरी लावणार आहे, ज्यात या काळातील गाजलेली गाणी स्पर्धक सादर करताना दिसतील.
कंगना राणावत ही आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची लेखक, दिग्दर्शक असून त्यात मुख्य भूमिका देखील साकारत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे सह-कलाकार अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.
या भागात एका मजेदार संभाषणात मानसी घोष हिने कंगनाला सांगितले की, ती कंगनाची मोठी फॅन आहे. ती कंगनाला उद्देशून म्हणाली, “मी बऱ्याच मुलाखतींमध्ये हे ऐकले आहे की, दिग्दर्शक अशी तक्रार करतात की तुम्ही ज्या चित्रपटात काम करता, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा यात देखील तुम्ही ढवळाढवळ करता. त्यामुळे तुमच्या सोबत काम करायला त्यांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवले का?”
त्यावर कंगनाने खेळकरपणे उत्तर दिले, “सारा सियाप्पा खतम करो.. याचा अर्थ तुला माहीत आहे ना? ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी.” हसत हसत कंगना पुढे म्हणाली, “हे काही खरे नाही. ज्यांच्यासोबत मी काम केले आहे, त्या सगळ्यांविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी मला नेहमीच प्रेरित केले आहे. काही उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली.
8 days to go #Emergency pic.twitter.com/hq6K45Vegq
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 9, 2025
क्वीन, तनु वेड्स मनू, फॅशन आणि गॅंगस्टर यांसारखे चित्रपट त्यातील अद्भुत फिल्मोग्राफीबद्दल नावाजले गेले. यामुळे स्वतः दिग्दर्शन करण्याची स्फूर्ती मला मिळाली.” कंगना पुढे म्हणते, “जेव्हा तुम्ही दहा लोकांसोबत काम करता, तेव्हा त्यातील दोघा-तिघांशी तुमच्या तारा नाही जुळत, पण तसे होणे ही सामान्य बाब आहे. तुम्ही सगळ्यांचे आवडते होण्यासाठी तुम्हाला स्वतः बदलण्याची गरज नाही.
मी 2005 मध्ये या व्यवसायात आले आणि आता 2025 उजाडले आहे. पण इथे अजूनही काही बोटावर मोजण्याइतकेच दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेते आहेत, ज्यांनी खरोखर मौलिक काम केले आहे. तुम्ही त्यांच्या अवतीभवती ‘चक्की पीसिंग’ करत राहता. त्यामुळे मी विचार केला, की नवीन प्रतिभा तयार करू या.” असं ती म्हणते.
‘या’ दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार !
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र, प्रदर्शनाच्या काही दिवस आधी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. चित्रपटात वादग्रस्त दृश्ये आहेत, त्यामुळे शांतता भंग पावू शकते, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता 17 जानेवारी 2025 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





