कंगना राणावत, मनोज बाजपेयी आणि सुशांत राजपूत यांच्या चित्रपटाला मिळाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

मुंबई – 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2019 मध्ये बनलेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 3 मे 2020 रोजी होणार होती परंतु कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलावे लागले.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मल्याळम चित्रपट ‘मराक्कर: अरबीकादलिंते सिहमम’ Marakkar Arabikkadalinte Simham (Malyalam) ला देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हिंदी चित्रपट भोसलेसाठी मनोज बाजपेयी आणि तमिळ चित्रपट असुरनसाठी धनुष यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना राणावतला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मणिकर्णिका आणि पंगा या दोन चित्रपटांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी शेवटची प्रवेशिका १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ठेवण्यात आली होती.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार विजय सेतुपती यांना सुपर डिलक्स या तमिळ चित्रपटासाठी देण्यात आला. त्याचबरोबर पल्लवी जोशीला ताश्कंद फाइल्स या हिंद चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – छिछोरे (सुशांत सिंग राजपूत स्टारर छिछोरेसाठी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार)
-सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – केसरी – तेरी मिट्टी – बी प्राक
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)
-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बहत्तर हुरेनसाठी संजय पूरण सिंह चौहान.
-विशेष उल्लेख – बिर्याणी, जोनाकी पोरुआ, लता भगवान करे, पिकासो.
-सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले (संवाद लेखक) – विवेक रंजन अग्निहोत्री (ताश्कंद फाइल्स) चित्रपटासाठी
-सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – हिंदी चित्रपट कस्तुरी.
-सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म – वाइल्ड कर्नाटक (डेव्हिड अॅटनबरो)
-सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक – सोहिनी चट्टोपाध्याय
-सिनेमातील सर्वोत्कृष्ट पुस्तक – प्रभाव (पीआर रामदास नायडू)





