Kangana Ranaut : कंगना राणावतची नवीन सुरुवात; उद्योगजकतेच्या दिशेने टाकले पाऊल !

Kangana Ranaut : चित्रपट आणि राजकारणानंतर आता बॉलिवूडची क्वीन कंगना राणावर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे. तिने मनालीमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी जमिनीची नोंदणीही करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या कंगनाच्या बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने सात दिवसांत सुमारे १५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
या चित्रपटाचे सॅटेलाइट, संगीत आणि ओटीटी हक्कही कोट्यवधींना विकले जातील असेही म्हटले जात आहे. त्यामुळे कंगना या चित्रपटाची कमाई मुंबईऐवजी मनालीत गुंतवत आहे.
कंगना आता तिचा व्यवसाय वाढवणार आहे आणि हॉटेल उद्योगात प्रवेश करणार आहे. बॉलिवूड क्वीनने मनालीत पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी त्याने मनालीमध्ये एक प्लॉट खरेदी केला आहे.
गुरुवारी, हॉटेलसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी कंगना मनाली तहसीलदारांकडे पोहोचली. तिने तहसीलदारांकडून भूखंडाची नोंदणी करून घेतली. तहसीलदार कार्यालयात जाण्यासाठी मनालीच्या मॉल रोडवरून जाणाऱ्या कंगनाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
कंगनाचे वडील अमरदीप म्हणाले की, जमिनीची नोंदणी झाली आहे. कंगनाला ‘इमर्जन्सी’ चित्रपटाकडून खूप आशा आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आता कंगना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या क्षेत्रातही नशीब आजमावणार आहे.





