Emergency Movie: ‘इंदिरा इज इंडिया’…कंगनाच्या ‘इमर्जेन्सी’चा जबरदस्त ट्रेलर आला समोर

Emergency Movie Trailer : अभिनेत्री कंगना रणौतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इमर्जेन्सी’ चित्रपटाची तिचे चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर समोर आला आहे.
‘इमर्जेन्सी’ चित्रपटामध्ये कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा दुसरा ट्रेलर खूबच जबरदस्त असून, चाहत्यांकडून सोशल मीडियावर तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. ट्रेलरमध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका उत्तमरित्या साकारताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतरचा काळ दाखवण्यात आला आहे.
1975, Emergency — A Defining chapter in Indian History.
Indira: India’s most powerful woman. Her ambition transformed the nation, but her #EMERGENCY plunged it into chaos.🎥 #EmergencyTrailer Out Now! https://t.co/Nf3Zq7HqRx pic.twitter.com/VVIpXtfLov
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 6, 2025
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ट्रेलर शेअर करत लिहिले की, 1975, आणीबाणी, भारतीय इतिहासातील एक निर्णायक अध्याय. इंदिरा: भारतातील सर्वात शक्तिशाली महिला. त्यांच्या महत्त्वाकांक्षेने देशाला पूर्णपणे बदलून टाकले. मात्र त्यांच्या आणीबाणीने अराजकता आणली.
या चित्रपटाचा पहिला ट्रेलर मागच्यावर्षी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर 4 वेळा चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर हा चित्रपट आता 17 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे. कंगनाच या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शक आहे. कंगनासोबतच, चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तलपदे, मिलिंद सोमन यांचीही प्रमुख भूमिका आहे.





