शिक्रापूर (वार्ताहर)- करंदी (ता. शिरूर) येथील अक्षय कंद्रूप या युवकाचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनी नुकतेच विशेष मुलांना कपडे व अन्नदान करत आपल्या मुलाच्या स्मृती जागवल्या आहेत. अक्षयच्या कुटुंबीयांनी नुकतेच सेवाधाम या विशेष मुलांच्या विद्यालयात सर्व मुलांना माजी सरपंच राहुल गव्हाणे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके यांच्या हस्ते कपडे वाटप करत अन्नदान केले आहे, याप्रसंगी सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल, अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे, नितीन कुलकर्णी, सोनाली शिनगारे, विठ्ठल कंद्रूप, कमल कंद्रूप, राहुल कंद्रूप, उद्योजक देवा भोर, केतन वाखारे, किरण गवारे, रवी शेळके, सर्पमित्र शुभम वाघ, मनीषा कंद्रूप, ज्योती बोर्हाडे यांसह आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना कंद्रूप कुटुंबियांच्या या उपक्रमामुळे विशेष मुलांना आनंद मिळत असल्याचे मत माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी आभार मानले.