वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का होतेय?

Kamal Rashid Khan On Parag Desai Death: वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मालक पराग देसाई यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. वास्तविक त्यांचा मृत्यू रस्त्यावरील कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या खळबळ उडाली आहे. आता यात बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खाननेही प्रवेश केला आहे. या प्रकरणी केआरकेने सोशल मीडियावर जॉन अब्राहम आणि रस्त्यावरील कुत्र्यांच्या रक्षणासाठी मोहीम राबवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
केआरकेने जॉनवर साधला निशाणा –
पराग देसाई हे 15 ऑक्टोबरला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यानंतर काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आता पराग यांच्या मृत्यूवर ट्विट करत कमाल खानने लिहिले की, ‘पराग यांच्या कुटुंबाने जॉन अब्राहम आणि रस्त्यावरील कुत्र्यांना वाचवण्यासाठी मोहीम चालवणाऱ्या इतर सर्व मूर्खांविरुद्ध एफआयआर दाखल करावी.’
Parag’s family should file FIR against #JohnAbraham and all other idiots, who do campaign to save street dogs. And Government should order to catch all the street dogs and put them in a cage. pic.twitter.com/jGxD55TQkI
— KRK (@kamaalrkhan) October 24, 2023
केआरकेच्या ट्विटवर यूजर्सनी अशा केल्या कमेंट –
केआरकेंच्या या ट्विटवर आता सोशल मीडिया यूजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. यापैकी काही लोक KRK ला सपोर्ट करत आहेत तर काही त्यांना विरोध करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, “कुत्र्यांवर प्रेम करणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र भटक्या कुत्र्यांमुळे या वाढत्या घटना अतिशय भीतीदायक आहेत. तर दुसर्याने लिहिले, “कुत्र्यांपेक्षा माणसेच जास्त नुकसान करतात, मग माणसांनाही रस्त्यावर फिरण्यापासून रोखले पाहिजे.”
जॉन अब्राहमला कुत्र्यांचा शौक –
बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम हा प्राणीप्रेमी आहे. तो अनेकदा रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोहीम राबवतो. अभिनेत्याने फक्त एक नाही तर अनेक रस्त्यावरचे कुत्रे पाळले आहेत.





