जॉन अब्राहम ‘फोर्स 3’मध्ये साऊथ अभिनेत्रीची वर्णी

John Abraham | बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम लवकरच ‘फोर्स 3’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो साउथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री मीनाक्षी चौधरीसोबत दिसणार आहे. मीनाक्षी चौधरी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. ‘लकी भास्कर’ चित्रपटातून तिने आपली ओळख निर्माण केली होती. आता तिची ‘फोर्स 3’मध्ये वर्णी लागली आहे.
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, वेंकटेशसोबत ‘संक्रांति वस्तुनम’मध्ये दिसलेली मीनाक्षीला ‘फोर्स ३’साठी साइन करण्यात आले आहे. अनेक नावांच्या ऑडिशननंतर जॉन अब्राहम आणि भाव धूलियाने ‘फोर्स ३’मध्ये मीनाक्षी चौधरीला फायनल केले आहे. जॉन प्रमाणेच चित्रपटात मीनाक्षी चौधरी देखील ॲक्शन करताना दिसणार आहे.
कोण आहे मीनाक्षी चौधरी?
मीनाक्षी चौधरीने २०१७ मध्ये हिंदी चित्रपट ‘अपस्टार्ट्स’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या ४ वर्षांत तिने तमीळ आणि तेलगूमध्ये ११ चित्रपट केले आहेत. ‘गोअट’, ‘गुंटूर कारम’, ‘हिट 2’, ‘लकी भास्कर’ आणि ‘संक्रांति वस्तुनाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करणारी मीनाक्षी आता हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. मीनाक्षी साउथ सिनेमात लोकप्रिय झाली असली तरी ती मूळची पंचकुला, हरियाणाची रहिवासी आहे.
५ मार्च १९९७ रोजी गुर्जर हिंदू कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीचे वडील दिवंगत बीआर चौधरी हे भारतीय सेनेत कर्नल होते. मीनाक्षीने २०१८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता आणि ‘मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल’चा ताज जिंकला. यानंतर मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ मध्ये ती फर्स्ट रनरअप निवडली गेली. तिने चंदीगडच्या सेंट सोल्जर इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. ती राज्यस्तरीय स्विमर आणि बॅडमिंटन खेळाडू राहिली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, जॉन अब्राहम क्षयरोहित शेट्टी दिग्दर्शित राकेश मारियाच्या बायोपिकचे शूटिंगकरत आहे. हा बायोपिक ऑक्टोबरच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ‘फोर्स 3’चे चित्रीकरण सुरू होईल. या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे.
या चित्रपटाचे दोन भाग रिलीज
2011 मध्ये फोर्स या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत निशिकांत कामत यांनी केले होते, ज्यामध्ये जॉन अब्राहम एका नव्या आणि दमदार अंदाजात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसूजा आणि राज बब्बर दिसले होते. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या ‘फोर्स 2’चे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले होते. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि ताहिर राज भसीन दिसले होते. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा:





