Kalyan-Ahilyanagar highway : कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर पीकअप व बुलेरोची समोरासमोर धडक; 1 ठार, 9 जखमी

Kalyan-Ahilyanagar highway : कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे येथे पिकअप व बुलेरो या दोन वाहनांच्या मध्ये समोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना बुधवार दि.२५ रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिकअप एम.एच.१६ डी पी.०१०३ हि गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड भरून अंबरनाथ (जिल्हा ठाणे) या ठिकाणी जात असताना बुधवार दि.२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अहिल्या नगर – कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील आणे गावाजवळ आल्यानंतर आळेफाटा कडुन येत असलेल्या बोलोरो (एम.एच.२० डि.व्ही १३०४) या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झालेले आहेत.
या दोन्हीही वाहनांमध्ये दहा जण बसलेले होते.अपघातामुळे पिकअप मध्ये असलेल्या टरबुजांचा महामार्गावर सडा पडला होता.
यामध्ये १) सचिन सकारू पठारे – वय २३ कोंभळणे, २) सुभाष पोपट दुधावडे – वय १९ अकलापूर, ३) किरण नारायण खंडागळे – वय २३, म्हसुंडी, ४) सुनील भिकाजी केदार – वय २७, म्हैसगाव ,५) अशोक दिलीप मढे – वय १९, चास पिंपळदरी ,६)संपत गंगाराम पठारे – वय ४२, ओतूर, ७) सुनील काळे – वय ३५, नारायणगाव, ८) दत्तू डोके – कोतूळ (ओतूर), ९)नामदेव मढे – वय ५५, शेरणखेल (ओतूर) हे सर्व जण जखमी झाले असुन यामध्ये तुकाराम पोपट मधे (वय ६५) राहणार अकलापुर ता.संगमनेर यांचे आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार चालु असताना मुत्यू झाला आहे. Kalyan-Ahilyanagar highway :
सदर अपघाताची फिर्याद गणेश लक्ष्मण खेडकर वय २३ राह.ठाकूर निमगाव पोस्ट राक्षि ता. शेवगाव जि.अहिल्यानगर यांनी दिली असून बुलेरो वाहन चालक सुनिल भिका केदार वय २७ रा.म्हैसगाव, ता.राहुरी, जि. अहिल्यानगर यांच्यावर आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kalyan-Ahilyanagar highway
सदर अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमित पोळ करत आहेत.
Orange Benefits: रोज एक संत्रे खाल तर शरीर म्हणेल धन्यवाद! जाणून घ्या ‘५’ जबरदस्त फायदे





