‘बाहुबली’मधील कालकेयची मराठी सिनेमात एन्ट्री

Aho Vikramaarka Fillm | ‘बाहुबलीः द बिगिनिंग’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनेता प्रभाससह यातील इतर कलाकारांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. यातील अभिनेता प्रभाकरने साकारलेली ‘कालकेय’ची भूमिकाही प्रचंड गाजली. यानंतर आता प्रभाकर मराठी सिनेमात झळकणार आहे.
येत्या ३० ऑगस्ट रोजी देव गिल प्रॉडक्शन यांचा ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ यात अभिनेता प्रभाकर ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका साकारताना पहायला मिळणार आहे. आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसादवर्मा यांची आहे.
तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे. ‘अहो विक्रमार्का’ हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.
दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे. तेजस्विनी देखील ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा ‘भवानी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. याशिवाय यात दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडेही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
धक्कादायक ! ‘ते’ व्हिडीओ दाखवून सहा विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग ; सर्वत्र संताप व्यक्त





