काजोलचे कमबॅक! ‘द ट्रायल सीझन २’ची खास अंदाजात केली घोषणा
The Trial 2 | अभिनेत्री काजोलचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर हिट वेब सीरिज ‘द ट्रायल’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. काजोलची ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ या सीरिजच्या पाहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
जिओ हॉटस्टारकडून काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती ‘द ट्रायल’ सीझन २ ची घोषणा करताना दिसतेय. या सीझनमध्ये काजोल पुन्हा एकदा नोयोनिका सेनगुप्ताच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘द ट्रायल’ सीझन २ हे येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्वीचा जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. The Trial 2 |
View this post on Instagram
काजोलबद्दल बोलायचं झालं तर, ९० च्या काळापासून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काजोलच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिच्या अलीकडच्या काही चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर त्यात ‘सलाम वेंकी’, ‘त्रिभंगा’, ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘माँ’, ‘सरजमीन’ आणि ‘तान्हाजी’ यांचा समावेश आहे. ओटीटीवर ‘द ट्रायल’मधून तिने 2023 मध्ये कमाल केली होती. आता तिच्या या दुसऱ्या सीझनला प्रेक्षक किती पसंती देतात, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. The Trial 2 |
हेही वाचा :





