मुंबई – सिंघम फेम अभिनेत्री “काजल अगरवाल” काल (दि. 30) प्रियकर गौतम किचलूबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तर गुरुवारी काजलचा मेहंदी आणि हळदीचा समारंभ पार पडला होता.
सध्या तिच्या लग्न समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दोघांनी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न केले. मात्र, कोरोनामुळे काजलच्या लग्नात मोजकेचं लोक उपस्थित होते.
या लग्नात दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक उपस्थित होते. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांची जोडी अतिशय क्यूट दिसत आहे. काजलने लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर गौतमने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. काजल गुलाबी रंगाच्या लेहग्यांमध्ये खूपचं सुंदर दिसत आहे.
काजल आणि गौतममधील हा विवाह अरेंज्ड-लव मॅरेज होता. गौतम किचलू हा एक इंटिरिअर डिजाईनर आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. लग्नानंतर काजलला सिनेमात काम करण्याची परवानगी त्याने दिली आहे. त्यामुळे लग्नानंतर देखील काजल आपल्या फॅन्सचे मनोरंजन करणार आहे.