ज्योती मल्होत्राचे मुंबई कनेक्शन समोर; लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन; फोटोही काढले

Jyoti Malhotra | हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी गुप्तचर म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्यानंतर सातत्याने तिच्याबाबतचे नवनवे खुलासे होत आहे. यादरम्यान आता तिच्याबद्दलची आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राच्या मुंबई कनेक्शनने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडली आहे.
अनेकवेळा केला मुंबईचा दौरा
ज्योतीने 2023 आणि 2024 मध्ये अनेकवेळा मुंबईचा दौरा केला आणि यावेळी तिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, तसेच संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ काढले आहे. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केले होते. मात्र ते विशेष डिव्हाईस पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे. मुंबई पोलिस आता या फोटो आणि व्हिडिओंचा तपास करत आहेत, तसेच हे पुरावे कोणाला पाठवले गेले आणि त्यात कोणती संवेदनशील माहिती होती याचा शोध घेत आहेत.
आतापर्यंत कधी आली ज्योती मुंबईत ?
ज्योती मल्होत्रा जुलै 2024 मध्ये लक्झरी बसने मुंबईत आली होती. ऑगस्ट 2024 मध्ये ती कर्णावती एक्सप्रेसने अहमदाबादहून मुंबईत आली, तर सप्टेंबर 2024 मध्ये ती दिल्लीहून पुन्हा मुंबईत आली. 2023 मध्ये गणपती उत्सवादरम्यान ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आली होती. या दौऱ्यादरम्यान तिने लाखो भाविकांच्या गर्दीचे आणि परिसराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. Jyoti Malhotra |
दरम्यान, ज्योती मल्होत्रा प्रकरणाने महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. लालबागच्या राजासारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचा गुप्तचरांसाठी वापर होण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने बारकाईने या प्रकरणाची तपासणी केली जात आहे.
हिसार पोलिसांचे निवेदनानुसार, ज्योती काही पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होती आणि त्यांना काही माहिती पुरवली. पोलिसांनी ज्योतीकडून 3 मोबाइल फोन, एक लॅपटॉप आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केली, ज्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनीही ज्योतीची चौकशी केली. ज्योतीच्या 4 बँक खात्यांची चौकशी सुरू आहे.
ज्योती मल्होत्राची कबुली
पाकिस्तानात अली हसनने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा नंबर तिने ‘जट रधाँवा’ नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने पाकिस्तानच्या दोन फेऱ्या केल्याचे देखील ज्योती मल्होत्राने म्हटलं आहे.
मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे. Jyoti Malhotra |
हेही वाचा:
अनिल गोटेंचा आरोप खरा ठरला; विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 उघडताच सापडलं कोट्यावधीचं घबाड





