पिंपरी | ज्येष्ठोत्सव सनवर्ल्ड मध्ये ब्लॅकमेल एकांकिका प्रथम
Updated On:

निगडी, (वार्ताहर) – सनवर्ल्ड या संस्थेतर्फे पुण्यात आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठोत्सव’ स्पर्धेत निगडी प्राधिकरणातील शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेने सादर केलेल्या ‘ब्लॅकमेल’ या एकांकिकेला प्रथम क्रकांकाचे पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत एकूण 15 संघांनी एकांकिका सादर केल्या. तर सलग 13 वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील संस्थेने पहिल्यांदाच या स्पधेर्र्त बाजी मारली आहे.
सदानंद इनामदार लिखीत व अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शित केलेली उत्कंठावर्धक व रहस्यमय असलेल्या या एकांकिकेत सुभाष भंडारे, चंद्रशेखर जोशी, सतीश सगदेव, शरद यनुवार, पल्लवी कोंडेकर व ज्योती कानेटकर या कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या. या एकांकिकेला मुकुंद जोशी व संपदा दिवाकर यांनी पार्श्वसंगीत दिले.





