कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अन् अमेरिकन गायिका दिसले एकत्र ; ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Justin Trudeau-Katy Perry। कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि जागतिक पॉप सेन्सेशन केटी पेरी एकत्र डिनरचा आनंद घेत असल्याचे समोर आले. आहे. कॅनडातील एका रेस्टॉरंटमध्ये दोघांनी एकत्र जेवण करताना आणि गप्पा मारतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मंगळवारी रात्री कॅनडातील मॉन्ट्रियलमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रुडो आणि पेरी यांच्यातील या गुप्त डिनरमुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चाना उधाण आले आहे.
या रेस्टॉरंटमध्ये उपस्थित नागरिकांनी याविषयी माहिती दिली आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शींनी, “दोघेही एकमेकांसोबत खूप आरामात होते. दोघे कॉकटेल, अॅपेटायझर्स आणि लॉबस्टरचा आस्वाद घेताना दिसले असल्याचे म्हटले आहे. तसेच केटी पेरी ट्रुडोच्या सहवासाचा आनंद घेत असल्याचे दिसत होते असेही सांगण्यात आले आहे.
कडक सुरक्षेत रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो Justin Trudeau-Katy Perry।
ज्या रेस्टॉरंटमध्ये केटी आणि ट्रूडो जेवण करत होते. सुरक्षा पथक त्याच्या बाहेर उपस्थित होते. जेवण झाल्यावर, दोघेही रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात गेले आणि उत्कृष्ट जेवणाबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
केटी पेरी तिच्या नवीन अल्बमसाठी कॅनडामध्ये आहे. ती लवकरच ओटावा याठिकाणी सादरीकरण करणार आहे. त्याच वेळी, जानेवारी २०२५ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यापासून ट्रुडो प्रसिद्धीपासून दूर झाले आहेत. १८ वर्षांच्या लग्नानंतर २०२३ मध्ये ते पत्नी सोफीपासून वेगळे झाले. या वर्षाच्या सुरुवातीला केटी पेरीने अभिनेता ऑरलँडो ब्लूमसोबत ब्रेकअप केले. दोघांनाही एक मुलगी आहे. Justin Trudeau-Katy Perry।





