Maharashtra Assembly Monsoon Session 2025 | राज्याचे विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विविध विषयांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यातच राज्यात मराठी भाषेच्या मुद्दयावरून देखील वातावरण तापले आहे. आज मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली होती. मात्र पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नसल्याने पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना पोलिसांनी धरपकड करत अटक केली. मोर्चेकरी आणि पोलिासांमध्ये झटापटी आणि शाब्दिक चकमक दिसून येत आहे. एकीकडे राज्यात मराठी-अमराठी वाद वाढत असतानाच इकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन छेडले आहे. आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलनाची हाक दिली. महाविकास आघाडीतील सर्व विरोधी पक्षनेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करताना दिसून आले. विरोधी पक्षनेते पद दिले नसल्याने विरोधकांकडून सरकारचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच ‘न्याय दया, न्याय दया, चीफ जस्टीस न्याय द्या,’ अशा घोषणा देखील यावेळी विरोधकांकडून देण्यात आल्या. याशिवाय ‘विरोधी पक्षनेता नसलेल्या सभागृहात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश यांचे स्वागत’ असे फलक विरोधकांकडे पाहायला मिळाले. विधानसभेत सरकार विरोधी पक्षांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. विधिमंडळामध्ये अद्याप विरोधी पक्षनेते पद दिले जात नसल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे. याबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे याविरोधात तक्रार विरोधकांकडुन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. Maharashtra Assembly Monsoon Session 2025 | दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. पण अद्यापही सरकारने त्याविषयीची घोषणा केलेली नाही. आज सरन्यायाधीश यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यांच्यासमोर कैफियत मांडण्यासाठी विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. Maharashtra Assembly Monsoon Session 2025 | गोगावलेंच्या एन्ट्रीला ‘ओम फट स्वाहा’च्या घोषणा या दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात प्रवेश करताच उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर गोगावलेंच्या एन्ट्रीला ‘ओम फट स्वाहा’च्या घोषणा देण्यात आल्याचे बघायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर घोषणाबाजी करण्यात आली. हेही वाचा: निवडणुकीपूर्वी नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक ; बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५% आरक्षण