निवडणुकीपूर्वी नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक ; बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५% आरक्षण

Women Reservation in Bihar। बिहारमध्ये काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील महिलांना मोठी भेट दिली. नितीशकुमारांनी राज्यातील महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमार यांनी घोषणा करताना बिहार राज्यातील मूळ रहिवासी महिलांना आता राज्यातील सर्व सरकारी सेवा, संवर्ग आणि सर्व स्तरांवरील पदांवर थेट भरतीमध्ये ३५% आरक्षण दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. हे आरक्षण सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांना लागू असणार आहे.
बिहार युवा आयोगाच्या स्थापनेची घोषणा Women Reservation in Bihar।
याशिवाय नितीश कुमार यांनी बिहार युवा आयोगाच्या स्थापनेचीही घोषणा केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नितीश यांनी, ‘बिहारमधील तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना मजबूत आणि सक्षम बनवणे या उद्देशाने राज्य सरकारने बिहार युवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंत्रिमंडळाने बिहार युवा आयोगाच्या स्थापनेलाही मान्यता दिली आहे.” असे म्हटले आहे.
मुझे यह बताते हुए प्रसन्नता हो रही है कि बिहार के युवाओं को अधिक से अधिक रोजगार के अवसर उपलब्ध कराने, उन्हें प्रशिक्षित करने तथा सशक्त और सक्षम बनाने के उद्देश्य से राज्य सरकार ने बिहार युवा आयोग के गठन का निर्णय लिया है और आज कैबिनेट द्वारा बिहार युवा आयोग के गठन की मंजूरी भी दे…
— Nitish Kumar (@NitishKumar) July 8, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, ‘समाजातील तरुणांच्या दर्जात सुधारणा आणि उन्नतीशी संबंधित सर्व बाबींवर सरकारला सल्ला देण्यात या आयोगाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तरुणांना चांगले शिक्षण आणि रोजगार सुनिश्चित करण्यासाठी हे आयोग सरकारी विभागांशी समन्वय साधेल” तेही त्यांनी म्हटले आहे.
आयोग अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात कार्यक्रम तयार करणार Women Reservation in Bihar।
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी, ‘बिहार युवा आयोगात एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि सात सदस्य असतील, ज्यांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असेल. हा आयोग राज्यातील स्थानिक तरुणांना राज्यातील खाजगी क्षेत्रातील नोकरीत प्राधान्य मिळेल का यावर लक्ष ठेवेल, तसेच राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या आणि काम करणाऱ्या तरुणांच्या हिताचे रक्षण करेल.” असे म्हटले आहे.
पुढे त्यांनी, “सामाजिक दुष्कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दारू आणि इतर ड्रग्जच्या प्रतिबंधासाठी कार्यक्रम तयार करणे आणि अशा प्रकरणांमध्ये सरकारला शिफारसी पाठवणे हे देखील महत्त्वाचे काम असेल.’ राज्य सरकारच्या या दूरदर्शी उपक्रमाचे उद्दिष्ट असे आहे की या आयोगाच्या माध्यमातून तरुण स्वावलंबी, कुशल आणि रोजगाराभिमुख बनतील जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल.” असे सांगितले आहे.





