जस्ट लुकिंग लाईक अ हॉट.! ‘Tripti Dimri’च्या घायाळ करणाऱ्या अदा; नव्या फोटोशूटने वेधले लक्ष

Tripti Dimri : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, कमाईच्या बाबतीत देखील या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत रोमँटिक सीन देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे ‘तृप्ती डिमरी’ रातोरात नॅशनल क्रश बनली आहे.
चित्रपटात मुख्य भूमिका नसतानाही लोकांनी तिच्या व्यक्तिरेखेची खूप दखल घेतली. आणि म्हणूनच सध्या अभिनेत्री तिच्या प्रत्येक स्टाईलने चाहत्यांना वेड लावते आहे. नुकतंच तृप्ती डिमरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केलं असून, यामध्ये तिचा सिझलिंग लुक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘ॲनिमल’ चित्रपटातील आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांची मने जिंकणारी तृप्ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नुकताच शेअर केलेल्या या नवीन फोटोंवरून तुमची सुद्धा नजर हटवणार नाही. फोटोमध्ये तिने पांढरा ओव्हरसाईज ब्लेझर घातला आहे, ज्यामध्ये तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे.
डीप नेक ओव्हरसाइज ब्लेझरमधील तृप्तीचा हा लूक चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात यशस्वी ठरला आहे. तृप्तीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विस्कटलेले केस, कमीत-कमी मेकअप आणि अप्रतिम पोझ देऊन तृप्ती चाहत्यांची मने जिंकत आहे.
View this post on Instagram
या पोस्टपूर्वीही तृप्तीने अनेकदा सोशल मीडियावर तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. पण या पोस्टवर चाहत्यांनी ज्याप्रकारे अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. लाईक्स आणि कमेंटचा तुफान वर्षाव या फोटोंवर होत आहे.
आणि म्हणूनच ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तृप्ती डिमरी रातोरात नॅशनल क्रश बनली. चित्रपटातील रणबीर कपूरसोबत तिची अप्रतिम केमिस्ट्रीही लोकांना आवडली. विशेषत: तिच्या बोल्ड दृश्यांनी प्रेक्षकांचे संपूर्ण लक्ष वेधून घेतले, या चित्रपटानंतर अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या देखील वेगाने वाढली.





