Who is Yash Patil? : वय फक्त २३ वर्षे, AI कंपनीची किंमत ४२ हजार कोटी! भारतीय वंशाचे यश पाटील आहेत तरी कोण?
Who is Yash Patil? : या मोठ्या करारामुळे यश पाटील यांची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. यश पाटील हे अप्लाइड कम्प्युटचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

Who is Yash Patil? : भारतीय वंशाच्या अवघ्या २३ वर्षीय यश पाटील यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि उद्योजकीय कौशल्याच्या जोरावर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या ‘अप्लाइड कम्प्युट’ (Applied Compute) या स्टार्टअप कंपनीचे जगातील आघाडीच्या सायबर सुरक्षा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘पालो अल्टो नेटवर्क्स’ (Palo Alto Networks) सोबत तब्बल ४.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ४२ हजार कोटी मूल्याला अधिग्रहण करण्यात आला आहे.
या मोठ्या करारामुळे यश पाटील यांची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. यश पाटील हे अप्लाइड कम्प्युटचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या महत्त्वपूर्ण कराराची माहिती दिली. या करारानुसार, अप्लाइड कम्प्युटचे पालो अल्टो नेटवर्क्सकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे. हा संपूर्ण व्यवहार शेअर्सच्या स्वरूपात होणार असून त्याचे मूल्य ४.५ अब्ज डॉलर इतके आहे.
विशेष म्हणजे, हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर यश पाटील पालो अल्टो नेटवर्क्समध्ये सह-मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी (Co-Chief AI Officer) म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी जागतिक स्तरावरील कंपनीत एवढे मोठे पद मिळणे ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
एआय क्षेत्रात मोठी झेप
यश पाटील यांनी रिदम गर्ग आणि लिंडन ली यांच्यासोबत मिळून अप्लाइड कम्प्युटची स्थापना केली होती. प्रत्येक कंपनीकडे स्वतःची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षमता असावी, या संकल्पनेतून त्यांनी या स्टार्टअपची सुरुवात केली.
Applied Compute has signed a definitive agreement to be acquired by Palo Alto Networks for $4.5B!
Rhythm, Linden, and I founded Applied Compute with a belief that was unusual at the time: that every company should own its intelligence. We think training, serving, and improving proprietary models will become a normal part of running a company.
To do useful work, a model needs to access sensitive data and systems, comply with policies, and remain explainable, verifiable, and auditable. This is the reason we’ve always prioritized security, and why joining Palo Alto Networks will help us go further faster. Customers will still own and control their models, and I’m excited for all the ways our combined capabilities can serve them even better.
Above all, I’m incredibly grateful for the AC team. A few dozen people in just over 18 months grew this company from zero revenue to over $100M in annualized revenue run-rate, working with many of the world’s most innovative companies. More to come soon.
— Yash Patil (@ypatil125) November 18, 2026
पालो अल्टो नेटवर्क्ससोबतच्या भागीदारीबाबत बोलताना यश यांनी आनंद व्यक्त केला. या नव्या सहकार्यामुळे कंपनीला अधिक वेगाने प्रगती करता येईल आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्राहकांचे त्यांच्या एआय मॉडेल्सवरील नियंत्रण आणि मालकी कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत यश पाटील?
यश पाटील हे भारतीय स्थलांतरित कुटुंबातील असून त्यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे झाला. त्यांच्या आई बालरोगतज्ज्ञ आहेत, तर वडील हार्डवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या वडिलांनी क्वालकॉम (Qualcomm) आणि एआरएम (ARM) यांसारख्या नामांकित सेमीकंडक्टर कंपन्यांमध्ये सर्किट डिझाइन आणि पॉवर आर्किटेक्चर क्षेत्रात काम केले आहे.
यश यांना तंत्रज्ञानाची आवड लहानपणापासूनच होती. कोविड-१९ महामारीच्या काळात ते हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी आपला मोठा भाऊ नील याच्यासोबत ‘हेल्पिन’ (Helpin) नावाचा प्रोग्राम तयार केला होता. या अनुभवातून त्यांच्या तंत्रज्ञानविषयक आवडीला अधिक चालना मिळाली.
पुढे त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी मिळवली. याच विद्यापीठात त्यांची भेट रिदम गर्ग आणि लिंडन ली यांच्याशी झाली. पुढे या तिघांनी एकत्र येत अप्लाइड कम्प्युट या कंपनीची स्थापना केली.





