जुन्नरकरांनो आता तरी काळजी घ्या.!, तालुक्यातआढळले तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण
Updated On:

जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी 25 गावांत नव्याने 47 जणांचे करोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 19 हजार 136 झाली आहे. तर 17 हजार 852 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 624 रुग्णांचा मृत्यू झाला असून 660 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बेल्हे गावात सर्वाधिक 6 रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल कांदळी, नारायणगाव प्रत्येकी 4, वडगाव कांदळी, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक प्रत्येकी 3, पाडळी, आळे, अहिनवेवाडी, वडगाव सहाणी,
कुसूर येथे प्रत्येकी प्रत्येकी 2; तर पिंपरी पेंढार, आगर, गोळेगाव, राजूरी, बोरी बुद्रुक, उदापूर, डिंगोरे, ओतूर, ओझर, हिवरे तर्फे नारायणगाव, मंगरुळ, मढ, बोतार्डे व जुन्नर शहरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.





