जुन्नरकरांनो आता तरी काळजी घ्या.! तालुक्यात करोना मृत्यूदर वाढला
Updated On:

जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी 27 गावांत नव्याने 56 जणांचे करोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 19 हजार 964 झाली आहे. तर 18 हजार 761 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
640 रुग्णांचा मृत्यू झाला असून 563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बोरी बुद्रुकमध्ये (7), वारुळवाडी (6), आळे, ओतूर, येणेरे (प्रत्येकी 4), बेल्हे, नारायणगाव (प्रत्येकी 3), कोळवाडी मढ, ओझर नं. 2, तेजेवाडी, पिंपळवंडी, उंचखडक, खानगाव (प्रत्येकी 2),
कोळवाडी, पिंपळगाव सिद्धनाथ, हिवरे तर्फे नारायणगाव, येडगाव, धालेवाडी, मांजरवाडी, डिंगोरे, वडगाव कांदळी, नगदवाडी, राजुरी, गुंजाळवाडी आर्वी, पारुंडे, कुसूर, जुन्नर शहरात (प्रत्येकी 1).





