पुणे जिल्हा | करवाढीविरोधात जुन्नरकर आक्रमक

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील करदात्या नागरिकांवर चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना खासगी कंपनीच्या वतीने शहरातील मालमत्ता धारकांची मोजमापे करताना चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे मोठ्या प्रमाणात करवाढ झालेली आहे. या करवाढीच्या विरोधात जुन्नर शहरातील नागरिक, व्यापारी तसेच सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना आदींनी नगरपरिषदेत कार्यालयावर सोमवारी (दि. 8) धडक मोर्चाचे आयोजन केलेले होते.
नगरपरिषद कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, सुनील मेहेर, चंद्रकांत कदम, माजी नगरसेवक फिरोज पठाण, समीर भगत, वैष्णवी चतुर, अनिल मेहेर, शाम खोत, अंबर परदेशी, विकी गोसावी, बिहारी परदेशी, चंद्रशेखर जोशी, मधुकर काजळे, धनराज खोत,
सूरज नानावटी, रउफ खान, सलमा सय्यद, कविता छाजेड आदींसह नागरिक व राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी संदीप भोळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच नव्याने लादलेली घरपट्टी ही रद्द न झाल्यास जुन्नर शहर बंद ठेवण्यात येऊन नगरपरिषद कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना अमरावती येथील एका खासगी एजन्सीला
सर्व्हे करण्याकरिता सर्वे करण्याकरिता 62 लाखांचे टेंडर देण्यात आले होते या एजन्सीच्या लोकांनी शहरातील भौगोलिक परिस्थितीची माहिती न घेता बर्याच ठिकाणी चुकीची व अंदाजे घेतलेली आहेत. सर्व्हे करताना इमारतीतील जिना मोकळा पॅसेज, गॅलरी तसेच दुकानाबाहेरील टाकण्यात आलेली पत्रा शेड दुकानाच्या आतमधील लास्टची मोजमापे घेतलेली आहेत
त्यामुळे मालमत्ता धारकांच्या घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, असे निदर्शनास आले आहे. या विरोधात नागरिकांमध्ये मोठा रोष असून अनेक मालमत्ताधारकांनी या करवाढी विरोधातील लेखी हरकती नगरपरिषद कार्यालयात जमा केलेले असून मनमानी पद्धतीने झालेली करवाढ रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ऑनलाइन प्रक्रिया दाखविण्यापुरती
प्रशासनाला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर सुरू असून प्रशासकीय कालावधीत गेल्या वर्षभरात 439 ठराव केले गेले आहेत ऑनलाइन प्रक्रिया फक्त दाखविण्या पुरती राबवली जाते तसेच विविध कामांचे बोगस निविदा काढल्या जाऊन यातून जनतेचा पैसा वाया घालविला जात असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
जी जुनी कर आकारणी बिले देण्यात आलेली आहेत. ती बिले नगरपरिषदेकडून देण्यात आलेली आहेत ती बिले वेळेवर भरणा करावी. ही बिले येत्या 31 जुलै अखेर भरावीत त्यानंतर या प्रत्येक बिलावर दोन टक्के शास्ती आकारणी करण्यात येणार आहे. तसेच नवीन करवाढी संदर्भात नगरपरिषदेकडे नागरिकांनी केलेल्या हरकतींवर निर्णय होईपर्यंत तसेच नवीन बिले प्राप्त होईपर्यंत ती दिले
नागरिकांना सध्या दिलेली ही नोटीस आहे याबाबत 11 जुलैपर्यंत हरकती घेता येणार आहे त्यानंतर कर मूल्यांकन अधिकारी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. आतापर्यंत सुमारे 950 हरकती प्राप्त झालेल्या आहेत.- संदीप भोळे, मुख्याधिकारी





