जुन्नर -उच्च माध्यमिक परीक्षेचा (बारावी) जुन्नर तालुक्याचा निकाल 94.16 टक्के लागला असून तालुक्याने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या 5196 विद्यार्थ्यांपैकी 4893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 439 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालये व टक्केवारी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर -92.64, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर-93.12, सद्गुरू महाविद्यालय पिंपरी पेंढार -91.93, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव -97.51, श्री बेल्हेश्वर कनिष्ठ महाविद्यालय 95.49, ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे-94.16, सुभाष विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय पिंपळवंडी-97.27, हिंदमाता महाविद्यालय वडगाव कांदळी -82.16, पंडित नेहरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा-95.83, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय तांबे-98.88, विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालय, राजुरी-92.17, अंजुमन कनिष्ठ महाविद्यालय जुन्नर -93.10, श्री रंगदास स्वामी महाविद्यालय आणे- 92.68, न्यू इंग्लिश स्कुल, आपटाळे-71.05, आणे माळशेज विद्या मंदिर मढ-97.82, शंकरराव बुट्टे कनिष्ठ महाविद्यालय जुन्नर-93.75, शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी -97.72,
जे. आर. गुंजाळ महाविद्यालय आळेफाटा-100, डॉ. कणसे महाविद्यालय खानापूर -100, हांडे देशमुख महाविद्यालय आळेफाटा -100, अनुदानित महाविद्यालय तळेरान -100, अनुदानित आश्रमशाळा कोळवाडी- 94.26, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय बांगरवाडी-98.92, विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय साकोरी-100, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा-90.62, ब्लुमिंगडेल कनिष्ठ महाविद्यालय-100, ज्ञानराज कनिष्ठ महाविद्यालय आळे-96.55, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर- 79.16, शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर- 89.77, रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव -92.30, सुभाष विद्यामंदिर पिंपळवंडी -61.11.