Junnar Road Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; धडकेत एकाचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी
Junnar Road Accident : रात्री १० च्या सुमारास महामार्गावर अपघात हा अभघात घडला; बोलेरो चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुल्हा दाखल करण्यात आला आहे.

Junnar Road Accident – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे गावच्या हद्दीत पिकअप आणि बोलेरो या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. बुधवारी (दि. २५) रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत.
अपघातामुळे महामार्गावर पिकअपमधील कलिंगडांचा मोठा सडा पडला होता. पिकअप (एम.एच. १६ डी.पी. ०१०३) ही गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार येथून कलिंगड भरून अंबरनाथच्या दिशेने जात होती. आणे गावाजवळ आल्यावर समोरून येणाऱ्या बोलेरो (एम.एच. २० डी.व्ही. १३०४) या वाहनाशी तिची जोराची धडक झाली.
या अपघातात तुकाराम पोपट मधे (वय ६५, रा. अकलापूर, ता. संगमनेर) यांचा आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच सचिन सकारू पठारे, सुभाष पोपट दुधावडे, किरण नारायण खंडागळे, सुनील भिकाजी केदार, अशोक दिलीप मढे, संपत गंगाराम पठारे, सुनील काळे, दत्तू डोके आणि नामदेव मढे हे नऊ जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गणेश लक्ष्मण खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो चालक सुनील भिकाजी केदार याच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पोळ या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





