Junnar News : जुन्नर तालुक्याची शान! ९ शाळांनी पटकावली ‘अ’ श्रेणी; राज्यात तालुक्याचे नाव उजळले
Junnar News : शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता मूल्यमापनात जुन्नर तालुक्यातील नऊ शाळांची उत्तुंग झेप; डिजिटल शिक्षण आणि गुणवत्तेच्या जोरावर पटकावली 'अ' श्रेणी.

Junnar News – जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या गुणवत्ता मूल्यमापन प्रक्रियेत तालुक्यातील एकूण नऊ शाळांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छ व सुरक्षित परिसर,
डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, विविध उपक्रमांची अंमलबजावणी तसेच शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन या सर्व निकषांवर या शाळांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.या शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत. ई-लर्निंग साधनांचा वापर, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विशेष उपक्रम, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, तसेच स्वच्छता व हरित परिसरासाठी केलेले प्रयत्न यामुळे या शाळा इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.
‘अ’ श्रेणी प्राप्त शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालनवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दातखिलेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे क्रमांक 1.





