जुन्नर: ओतूर येथील बाबितमळा परिसरात बिबट्याचा दाम्पत्यावर हल्ला
Updated On:

ओतूर – ओतूर (ता. जुन्नर) येथील बाबितमळा येथील संतोष बन्सीधर गिते व योगिता संतोष गिते हे दोन्ही पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. कपर्दिकेश्वर मंदिराच्या पुढे पिंपळगाव जोगा कॅनाल जवळ हा हल्ला झाला आहे.
मागील आठवड्यात याच ठिकाणी एका महिलेवर बिबट्या कडून हल्ला झाला होता. बिबट्यांच्या वाढत्या मानवी हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याठिकाणी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





