ओझर (प्रतिनिधी) : शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा हा तालुका असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांना बेल्हा जिल्हा परिषदेच्या गटातून सर्वात जास्त मतदान होणार, अशी ग्वाही पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत घोडके यांनी गुंळजवाडी येथे दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर (Satyashil Sherkar) यांच्या प्रचार दौरा राजुरी-बेल्हा जिल्हा परिषदेच्या गटात आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रंसगी (Junnar Assembly Elections 2024) उमेदवार सत्यशिल शेरकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, जेष्ठ नेते अनंतराव चौगुले, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, वल्लभ शेळके, खरेदी विक्री संघाचे संचालक लहु गुंजाळ, अशोक घोडके, बेल्हे गावचे माजी सरपंच महेश बांगर, मोहन बांगर,आनंदा बेलकर,संतोष वाव्हळ, खंडु बेलकर, बाबाजी शिंदे , गोरक्षनाथ शिंदे, हनुमान शिंदे, जाणकु डावखर, पांडुरंग गाडेकर, पंकज भोसले, काशिनाथ गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. घोडके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नऊ हजारांचे लीड या विभागातुन दिले होते तसेच या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे उमेदवाराचेच काम करणार असुन गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे करण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत. श्री विघ्नहर कारखान्याच्या माध्यमातून सत्यशील शेरकर यांचे कामकाज संपूर्ण जुन्नर तालुक्याने पहिले आहे, त्यामुळे शेरकर हे तालुक्याचा विकास करतील यात शंका नाही, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली . शिवसैनिक जीवाचे रान करून सत्यशिल शेरकर यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार – गुलाबशेठ पारखे खरेदी विक्री संघाचे संचालक लहु गुंजाळ म्हणाले की, जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामस्थ हे शरद पवार यांना मानणारा असुन पवार साहेबांनी तालुक्यात पाच धरणे केली व यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. भाजपा सरकारच्या काळात शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा हमी भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला घरी बसवा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांना मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी सत्यशील शेरकर यांनी या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले .