ओझर : जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या विजयासाठी एकटवला आहे , लोकसभा प्रमाणेच विधानसभेला देखील जीवाचे रान करून सत्यशिल शेरकर मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे , असे आश्वासन धालेवाडी – सावरगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे बस्ती येथे केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ बस्ती – सावरगाव या ठिकाणी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे, पंचायत समीतीने माजी सभापती बाजीराव ढोले, उत्तम काशिद, शिरोली बु. सरपंच प्रदिप थोरवे, विकी पारखे, रोहीदास गोरडे, महादेव बाळसराफ, अविनाश भगत, तुषार वाबळे, अर्चना भुजबळ, वैभव कोरडे, अशोक सोनवणे , अशोक काळे आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजपाने शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम केले आहे , हि जनता त्यांना कधीच माफ करणार नाही . महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना निवडुन आणण्याची सर्व जबाबदारी शिवसैनिकांची आहे. दोन वर्षाच्या युती सरकारच्या काळात शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे आता सर्वांना सत्तातर हवे आहे, त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच असा विश्वास गुलाबशेठ पारखे यांनी व्यक्त केला .
सत्यशील शेरकर म्हणाले की, तालुका सुजलम सुफलाम करण्याचे काम कोणी केले असेल ते फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार यांनीच केले आहे. मिना खोरे विभागात पाणी प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, हा प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असुन तो सोडवणारच असा विश्वास शेरकर यांनी करीत जुन्नर तालुक्यात जिएमआरटीचा प्रकल्प असल्याने या ठिकाणी एमआयडीसी होऊ शकत नाही. त्यामुळे युवकांना नोक-या उपलब्ध होत नाहीत.
तालुक्यातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल या कडे विशेष लक्ष देण्यात असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी शेरकर यांनी शिवसैनिकांचे आभार व्यक्त करून लोकसभेला आघाडी दिली होती. त्याच पद्धतीने शिवसैनिक आजही काम करीत असून महाविकास आघाडीला निश्चित आघाडी मिळेल असा विश्वास व्यक्त केला .
यावेळी बस्तीचे माजी सरपंच रोहिदास कोरडे, सावरगावचे ऍड. मारुती ढमडेरे, रामदास नायकोडी यांनी आपले विचार व्यक्त करून सत्यशील शेरकर यांना पाठींबा जाहीर केला.