Junnar Election : नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज दाखल; २० नगरसेवक पदाकरिता सहा दिवसांत ३६ अर्ज

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – जुन्नर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता निवड होणाऱ्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आत्तापर्यंत २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर २० नगरसेवक पदाकरिता गेल्या सहा दिवसांत एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिली.सोमवार, दि. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, दि. १७ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
वीस नगरसेवक पदाकरिता १० प्रभागातून दि. १५ नोव्हेंबर रोजी २४ उमेदवारी अर्ज विविध राजकीय पक्षांच्या नावाने आणि अपक्ष म्हणून जमा केले गेले आहेत. दरम्यान, रविवारची शासकीय सुट्टी असूनही दि. १६ व सोमवार दि. १७ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चरण कोल्हे यांनी दिली.





