Junior NTR injury : ज्युनिअर एटीआर रुग्णालयात दाखल; खांद्याला झाली दुखापत, टीमने दिली हेल्थ अपडेट
Junior ATR injury : अभिनेत्याला दुखापत सिनेमाच्या सेटवर झाली असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील करत आहेत.

Junior ATR injury : तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या(Junior NTR ) चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या खांद्याला दुखापत झाली असून, डॉक्टरांनी त्याला सहा ते आठ आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ही माहिती एनटीआरच्या टीमने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.
सध्या एनटीआर त्याच्या आगामी बहुचर्चित ड्रॅगन सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अभिनेत्याला दुखापत नेमकी कशी झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अभिनेत्याला दुखापत सिनेमाच्या सेटवर झाली असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील करत आहेत.
निवेदनात काय म्हटलंय? (Junior NTR injury)

Junior NTR injury : ज्युनिअर एटीआर रुग्णालयात दाखल; खांद्याला झाली दुखापत, टीमने दिली हेल्थ अपडेट
“आज संध्याकाळी एनटीआर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डॉ. जे. मधुसूदन राव आणि डॉ. आर. ए. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक त्यांच्या दुखापतीवर उपचार करत आहे. लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना सहा ते आठ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचं कारण नाही. त्यांच्या तब्येतीसंदर्भातील अधिकृत माहिती वेळोवेळी दिली जाईल.” असे टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे
‘ड्रॅगन’ सिनेमात काय खास? (Junior NTR injury)
‘ड्रॅगन’ची कथा १९६७ च्या पार्श्वभूमीवर आधारित असून अफूच्या व्यापाराभोवती फिरते. या सिनेमात ज्युनियर एनटीआर ‘अफगाण ट्रेडिंग कंपनी’च्या मुख्य मारेकरी ‘लुगर’च्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात रुक्मिणी वसंत, अनिल कपूर, बिजू मेनन, गुरू सोमासुंदरम, आशुतोष राणा, खुशबू सुंदर, राजीव कनाकाला आणि सिद्धांत गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स आणि एनटीआर आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे.
‘ड्रॅगन’ कधी प्रदर्शित होणार? (Junior NTR injury)
‘ड्रॅगन’ हा सिनेमा सुरुवातीला २५ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून आता हा सिनेमा ११ जून २०२७ रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.





