June Bank Holidays 2026 : जून महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद; कधी ते जाणून घ्या…
June Bank Holidays 2026: राज्यानुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असणार

June Bank Holidays 2026 : उद्यापासून जून महिना सुरू होणार असून, देशभरातील बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या, तसेच प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश आहे
जून महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण 13 दिवस बंद राहतील. यापैकी 6 (4 रविवार आणि 2 शनिवार) नियमित सुट्ट्या असतील, तर उर्वरित सुट्ट्या राज्य आणि स्थानिक सणांनुसार बदलतील. ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’नुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने काही विशिष्ट सुट्ट्या निश्चित केल्या आहेत, ज्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात.
केव्हा असणार सुट्ट्या ?
7 जून, 2026- रविवार
13 जून, 2026 – दुसरा शनिवार
15 जून – राजा संक्रांती आणि वायएमए दिनानिमित्त फक्त ओडिशा आणि मिझोरममध्ये बँका बंद
17 जून – महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये बँका बंद
18 जून – गुरु अर्जुन देव यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद
21 जून, 2026 – रविवार
25 जून – मोहरम निमित्त विजयवाडा आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद
26 जून – मोहरम (आशुरा) निमित्त देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद
27 जून, 2026- चौथा शनिवार
28 जून, 2026- रविवार
दरम्यान, बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहक डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये यूपीआय व्यवहार, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएममधून रोख रक्कम काढणे यांचा समावेश आहे.
हेही वाचा:




