Juhi Chawla: अभिनेत्री जुही चावलाने अभिनयासह तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्या ती इंडस्ट्रीपासून दुर असल्याचे दिसते. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिने मुलीच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जुही चावलाने मुलीला वाढदिवसानिमित्त हजार झाडे लावली आहेत. जुहीने लेकीच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तब्बल १ हजार झाडे लावली आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत जुहीने ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासह एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची मुलगी, पती जय मेहता आणि मुलगा अर्जुन मेहतासोबत दिसत आहे. या फोटोला तिने “१ हजार झाडे माझी लहान मुलगी जान्हवीसाठी…हॅपी बर्थडे,” असं कॅप्शन दिलं आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
जुही चावलाच्या या कामगिरीनंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, जुहीने 1995 मध्ये जय मेहता यांच्याशी लग्नगाठ बांधली. जय मेहता यांच्या पहिल्या पत्नीचं निधनानंतर त्यांनी जुहीशी लग्न केले. जुही आणि जय यांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.
जुहीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने 1986 मध्ये ‘सुलतनत’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने ‘कयामत से कयामत तक’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘लुटेरे’, ‘हम हैं राही प्यार के’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री शेवटची वेब सीरिज ‘हुश हुश’ मध्ये दिसली होती. जो 22 सप्टेंबर 2022 रोजी Amazon Prime Video वर रिलीज झाला होता.