Parth Jindal : जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियामध्ये मोठा बदल; चेअरमनपदी पार्थ जिंदाल यांची नियुक्ती
Parth Jindal : JSW MG Motor India ने पार्थ जिंदाल यांची नव्या चेअरमनपदी नियुक्ती केली आहे. इलेक्ट्रिक कार, उत्पादन क्षमता आणि लोकलायझेशनवर कंपनीचा भर आहे.

Parth Jindal : भारतातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपल्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल केला आहे. कंपनीने पार्थ जिंदाल यांची चेअरमनपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया सध्या इलेक्ट्रिक कार, नवीन मॉडेल्स आणि भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळे कंपनीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर पार्थ जिंदाल यांच्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पार्थ जिंदाल हे कंपनीच्या सुरुवातीपासूनच बोर्डाचा भाग आहेत. जेएसडब्ल्यू समूह आणि चीनची एसएआयसी मोटर यांच्यात संयुक्त उपक्रम सुरू झाल्यापासून ते कंपनीशी जोडलेले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत उत्पादन धोरण, उत्पादन क्षमता वाढवणे आणि भारतातील लोकलायझेशन या क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
कंपनीच्या आगामी विस्ताराच्या योजनांमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची राहण्याची शक्यता आहे.
अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या –
पार्थ जिंदाल हे जेएसडब्ल्यू सिमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर, जेएसडब्ल्यू पेंट्स चे मॅनेजिंग डायरेक्टर, जेएसडब्ल्यू ड्युलक्स लिमिटेड चे चेअरमन आणि जेएसडब्ल्यू एनर्जी च्या बोर्डावर डायरेक्टर आहेत. याशिवाय तेजेएसडब्ल्यू स्पोर्ट्स चे संस्थापक असून दिल्ली कॅपिटल्स चे चेअरमन आणि सह-मालक देखील आहेत.





