Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी चाहत्यांची मागितली माफी, काय आहे कारण?

Delhi Capitals Co owner Parth Jindal apologizes to fans : आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला प्लेऑफसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आपल्या कामगिरीने चाहत्यांना निराश केले आहे. बुधवारी, मुंबई इंडियन्सकडून ५९ धावांनी पराभव पत्करल्यानंतर ते प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडले. सामन्यानंतर, रात्री उशिरा, दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि संघाच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली.
पार्थ जिंदाल यांनी चाहत्यांची मागितली माफी –
पार्थ जिंदाल जिंदाल यांनी रात्री १.३६ वाजता एक्सवर पोस्ट केली. ज्यामध्ये लिहिले, ‘दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व चाहत्यांनो मला माफ करा! तुमच्याप्रमाणेच, मलाही हंगामाच्या उत्तरार्धात त्रास सहन करावा लागला. सुरुवात जितकी छान होती, शेवटही तितकाच भयानक होता. या मोहिमेतून काही सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत. पण आता आमचे लक्ष पुढील सामन्यावर आहे, जो आम्हाला जिंकायचा आहे. हंगाम संपल्यानंतर, सर्व पैलूंवर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असेल.”
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरी –
Sorry to all @DelhiCapitals fans – like you i too am reeling from the second half of the season. What started so well ended extremely poorly. There are positives to take from this campaign but for now all focus on the next game which we need to win. Post the season there will…
— Parth Jindal (@ParthJindal11) May 21, 2025
आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात जबरदस्त सुरुवात झाली होती. दिल्लीने त्यांचे पहिले चार सामने सलग जिंकले होते. मात्र, पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करल्यानंतर, त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहावा सामना जिंकला. पण त्यानंतर, या संघाला ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले. ज्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही.
हेही वाचा – GT vs LSG : मिचेल मार्शने झळकावले ऐतिहासक शतक! १७ वर्षानंतर केला’हा’ खास पराक्रम
मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर –
बुधवारी मुंबई इंडियन्सकडून ५९ धावांनी पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु १९ व्या षटकात संघ फक्त १२१ धावांवर आटोपला. या विजयासह, मुंबई इंडियन्सने १६ गुणांसह आयपीएल प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली. दिल्ली कॅपिटल्स सध्या १३ सामन्यातील १३ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. या हंगामातील त्यांचा शेवटचा सामना २४ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे.





