J.P. Nadda Health Update : मोठी बातमी..! केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडली; एम्स रुग्णालयात दाखल
J.P. Nadda Health Update : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

J.P. Nadda Health Update : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (J.P. Nadda Health Update)
एम्सकडून नड्डा यांच्या प्रकृतीबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, कोरोनरी अँजिओग्राफीसह काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या नड्डा यांची प्रकृती स्थिर असून कार्डिओलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (J.P. Nadda Health Update)
Official statement by AIIMS New Delhi regarding the health status of Hon’ble Union Minister of Health and Family Welfare, Shri J.P. Nadda. pic.twitter.com/zsV5gXd4h9
— AIIMS, New Delhi 🇮🇳 (@aiims_newdelhi) August 14, 2026
१३ ऑगस्टला कुटुंबीयांसोबत फडकावला तिरंगा
दरम्यान, प्रकृती बिघडण्यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी जे. पी. नड्डा यांनी आपल्या कुटुंबीयांसह घरी तिरंगा फडकावला होता. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच देशवासीयांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. (J.P. Nadda Health Update)
नड्डा यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. (J.P. Nadda Health Update)
J. P. Nadda : मोदी सरकारची कामगिरी सुवर्णाक्षरांत नोंदवली जाईल; जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले मत





