पीएम मोदी यांचे जेपी नड्डा यांनी केले ‘हार्दिक अभिनंदन’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबतच, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकही दिल्लीत सातत्याने बैठका घेत आहे. आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मोदी ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Delhi: At the NDA Parliamentary Party meeting, BJP national president JP Nadda says “I want to that NDA got a majority in the Lok Sabha Elections and we also formed out govt in Odisha. I am happy to inform you that the NDA govt was also formed in Andhra Pradesh. In… pic.twitter.com/4dnizE3LTR
— ANI (@ANI) June 7, 2024
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आहे. मात्र, एकट्या भाजपला बहुमताचा आकडा (272) गाठता आला नाही आणि केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी भारत ब्लॉकने 234 जागा जिंकल्या आहेत.
अशात आज नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचा दावा करत आहे. यावेळी मोदी यांचे जेपी नड्डा यांचे हार्दिक अभिनंदन केले. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, ‘देशाच्या सेवेसाठी प्रत्येक क्षण घालवणाऱ्या पंतप्रधानांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. त्यामुळेच आज भारत इतिहास रचत आहे आणि एनडीए सलग तिसऱ्यांदा बहुमताचे सरकार बनवत आहे.’
मंचावर उपस्थित नेत्यांची यादी
1. अनुप्रिया पटेल
2. जीतनराम मांझी
3. चिराग पासवान
4. एकनाथ शिंदे
5. अजित पवार
6. नीतीश कुमार
7. चंद्रबाबू नायडू
8. एचडी कुमारस्वामी
9. पवन कल्याण
10. जेपी नड्डा
11. राजनाथ सिंह





