जॉन अब्राहम नव्या अवतारात; ‘तेहरान’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

John Abraham | बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम अभिनयासह त्याच्या जबरदस्त स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. लवकरच ‘तेहरान’ चित्रपटात नव्या भूमिकेत पाहायाला मिळणार आहे. यात तो एका गुप्तहेराच्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित या चित्रपटातील जॉन अब्राहमचा जबरदस्त लूक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
२०१२ मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटावर हा चित्रपट आधारित आहे. या घटनेमुळे इस्राईल, इराण आणि भारत या देशांमध्ये तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवरची ही कथा थरारक आहे. ‘तेहरान’मध्ये जॉनने साकारलेला राजीव कुमार हा एक गुप्तहेर आहे, पण तो देशासाठी काम करतोय की कुणाच्या हातातील खेळणं बनतो, हेच सिनेमाचं मुख्य गूढ आहे. John Abraham |
View this post on Instagram
दरम्यान, इम्तियाज अली आणि मॅडॉक फिल्म्सने तयार केलेला हा चित्रपट अरुण गोपालन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात जॉनसोबत मानुषी छिल्लर, नीरू बाजवा आणि मधुरिमा तुली यांच्याही भूमिका आहेत. जॉनचा हा आगामी चित्रपट ‘तेहरान’ OTT वर पाहता येणार आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, म्हणजेच 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा प्रीमियर OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर होणार आहे. हा चित्रपट यापूर्वी 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे त्याची प्रदर्शन तारीख सतत बदलत गेली. आता मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. John Abraham |
हेही वाचा :





